औरंगाबाद
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून औरंगाबाद येथील कॅनॉट परिसरामध्ये एक वादळ भारताचं या चळवळीमार्फत थरार राष्ट्रगीताचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम २०१६पासून देशातील ६ राज्यांमध्ये,९० पेक्षा जास्त शहरांमध्ये व ३५० पेक्षा जास्त ठिकाणी. राष्ट्रगीत व झेंडावंदन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो हा कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा जातीचा कार्यक्रम नसून आपल्या भारताचा राष्ट्राचा राष्ट्र प्रेमाचा राष्ट्रीय एकात्मतेचा कार्यक्रम असतो

औरंगाबाद मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात २६ जानेवारी २०२२ पासून झाली आणि औरंगाबाद वासीयांनी मोठ्याप्रमाणात प्रतिसाद दिला अशी माहिती प्रज्ञा विजय झाडे नागपूर शहर येथील रहिवासी यांनी सांगीतले प्रज्ञा झाडे या प्रगती महाविद्यालयात औरंगाबाद येथे एम. एस .सी .करत आहे तसेच बाकी सदस्य आकाश हिवराळे ,आणि कमरान शेख यांनी त्यांना सहकार्य केले अशाप्रकारे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला त्याबद्दल टीम एक वादळ भारताचं कडून औरंगाबाद वासियांचे आभार व्यक्त करण्यात आले जर कोणाला या चळवळीचे मध्ये सहभाग घ्यायचा असेल

तर ९५९५७७७३५८ या क्रमांकाशी संपर्क करा व सहभागी व्हा एन.जी.ओ आणि जिगरबाज तरुणांचे स्वागत आहे अशी माहिती औरंगाबाद येथे एम. एस.सी .ला शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी प्रज्ञा विजय झाडे मौजे केतापार ता. कळमेश्वर , जिल्हा नागपुर यांनी अशी माहिती दिली
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद संपर्क क्रमांक 📞📱 8007234300