(सचिन बिद्री:धाराशिव)
उमरगा शहरातील मुख्य रस्त्यावरून(राष्ट्रीय महामार्गवरून)वाहते नाल्याचे दुर्गंधीत सांडपानी त्यामुळे उद्भवणारे अपघात आणि महाविद्यालयाला व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास,उमरगा लोहारा तालुक्यातील सुशिक्षित व उच्चशिक्षित तरुनांची वाढती बेरोजगारी आहेत. राष्ट्रीय महामार्गलागतं भव्य औद्योगीक वसाहत उपलब्ध असूनही मोठे उद्योग वा मोठ्या कंपन्या अद्याप उपलब्ध नाहीत.शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप प्राप्त झाला नाही व शेतकऱ्यांना बँका सहजासहजी कर्ज पुरवठा करत नाहीत अश्या नानाविध विषयावर दि 6 एप्रिल रोजी माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू आणि सातलिंग स्वामी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावर तत्परतेने उपाययोजना आखने अत्यावश्यक असून देशपातळीवर ब्लुचिप नामवंत कंपनीचा प्रोडक्शन प्लॅन्ट उमरगा औद्योगिक वसाहतीत सुरु करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल जेणे करून मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील बेरोजगार युवक युवतीना हक्काचे रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास देण्यात आला,तसेच शहरातील राष्ट्रीय महामार्गवरून जाणाऱ्या सांडपाण्याबाबत महामार्गाच्या दोन्ही बाजूने अंतर्गत नाल्याचे काम सुरु करण्यासंबंधी संबंधित विभाग प्रमुखाशी सविस्तर माहिती घेऊन आदेश देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तर उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विना अट बँकेतर्फे तत्परतेने वित्त पुरवठा करण्यासंबंधी पाऊल उचलले जाईल याशिवाय तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रामुख्याने उमरगा लोहारा तालुक्यातील या भेटीदरम्यान उपस्थित सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्परतेने सोडवण्याची ग्वाही यावेळी दिली अशी माहिती श्री सातलिंग स्वामी यांनी सांगितले.