सचिन बिद्री:उमरगा
शहरातील मुख्य दोन रस्ते ‘महावीर मेडिकल ते शिवपुरी कॉलनी’ (07 कोटी)व ‘आझाद चौक ते त्रिकोळी रोड’ (03 कोटी) हे दोन्ही रस्त्यांच्या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते व कृउबा.समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवानेते किरण गायकवाड, माजी जि.प.बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य यांच्या प्रमुख उपस्थितीत दि7 रोजी भुमिपूजन सोहळा संपन्न झाला.
दोन्ही रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सदर दोन्ही रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे निधी अभावी सदर रस्ते करण्यास अनेक अडचणी येत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सदर दोन्ही रस्ते तात्काळ मुख्यमंत्री यांना विशेष बाब म्हणून मंजूर करण्याची विनंती केली होती. या विनंतीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दोन्ही रस्ते खास बाब म्हणून मंजूर केले.
यावेळी कृउबा.समितीचे माजी सभापती जितेंद्रजी शिंदे, युवानेते किरण गायकवाड, माजी जि.प.बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य, तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, माजी नगरसेवक बप्पा हराळकर, सिद्रामप्पा चिंचोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, माजी नगराध्यक्ष धनंजय मुंसांडे, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, नितीन होळी, माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, बालाजी पाटील, लोहारा माजी नगरसेवक अभिमान खराडे, दळगडे, कावळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन जाधव, युवा सेना विधानसभा प्रमुख शरद पवार, योगेश तपसाळे, गोपाळ जाधव, बालाजी जाधव, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, मुजीब इनामदार, शफी चौधरी, अमर शिंदे, रोहित पवार, सचिन शिंदे सर, अशोक काळे, रणजीत ठाकूर, लहू औरादे, खंडू औरादे, श्रीकांत पतगे, भूमिपुत्र वाघ, जवळगे सर, संतराम मुर्जानी, टांगे सर, गिरीष सूर्यवंशी, डॉ.तावशीकर, राजू जाधव, विराट माळी, संजय ढोणे, युवराज गायकवाड, विशाल कोकणे, जमादार धीरज, गोविंद दांडगुले, गोविंद पवार, हैदर शेख, इब्राहिम शेख, विनायक कुलकर्णी, बाळू शिंदे, राजन वाघमारे, समीर लोणी, चंद्रकांत मुरमे, हनुमंत गुंड उपस्थित होते.