मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद वकील संघटनेच्या २०२३ २४ वर्षांकरिता निवडणूक पार पडली. लोहगाव (ता. तुळजापूर) येथील रहिवासी व तुळजापूर न्यायालयाचे अॅड. अमोल जगताप यांनी उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद या वकील संघटनेच्या निवडणुकीत सहसचिव या पदाकरिता निवडणूक अर्ज दाखल केला होता. या पदाकरिता अँड. अमोल जगताप यांची बिनविरोध सहसचिवपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
अमोल जगताप हे तुळजापूर येथील ग्रामीण भागातून येऊन औरंगाबाद उच्च न्यायालयात वकिली .व्यवसायाकरिता गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कामातून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे आपली ओळख उत्तम रीतीने निर्माण केली आहे.
या निवडीबद्दल तुळजापूर तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रतिनिधी आयुब शेख