ज्ञानयोगी अवलिया कार्यकारी अभियांत्याची महानिर्मितीतुन सेवानिवृत्तीविनोद गोडबोले नागपूरएक उत्कृष्ट अभियंता म्हणून ज्याचे नावलौकिक आहे शिवाय इतर कलागुनाणा जोपासणारा,संवेदनशील मनाने समाजरूपी सागरातून विविध मोती टिपणारा त्या मोत्यांची गुंफण करून म्हणजेच ‘मोती” हे पुस्तक लिहिणारा ज्ञानयोगी अवलिया डॉ अतुल बंसोड कार्यकारी अभियंता या पदावरुन ३०सप्टेंबरला सलग ३५ वर्षाची सेवा करीत महाजेनकोतुन सेवानिवृत्ती झाल्या निमित्य त्यांच्या “मोती” पुस्तकाचे विमोचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील किटकरू यांचे शुभहस्ते २८ सेप्टेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आले तर ३० सेप्टेंबर रोजी महानिर्मिती कोराडी विज केंद्राच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात उपमुख्य अभियंता कासुलकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ अतुल बंसोड स्वपत्नी अर्चना यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांचे आईवडील व इतर नातेवाईक,महाजेनकोचे अधिकारी,कर्मचारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
**राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा लाभलेले सुशिक्षित व सुसंस्कृत असलेल्या दिवाकर बंसोड परिवारात सेप्टेंबर १९६६ ला नागपुर येथे अतुल यांचा जन्म…