कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज (ता. १३) कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेने निवेदनाद्वारे कळविले आहे.


आंदोलनाच्या काळात ‘अत्यावश्यक सेवा’ मात्र सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. हे ‘काम बंद आंदोलन’ मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.