बाळापूर:– दिनांक १ जानेवारी नवं वर्षाचे औचित्य साधून भिमा कोरेगांव शौर्य दिन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बाळापूर येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला फुले आंबेडकर विद्वत्त सभेचे महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन मा. भास्कर भोजने सर आणि फुले आंबेडकर विद्वत्त सभेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रा. विनोद ऊपर्वट सर प्रमुख अतिथी म्हणून हजर होते…!!
बाळापूर शहरातील विविध बौद्ध वस्तीमधील बौद्ध ऊपासक ऊपासिका यांनी आपापल्या वार्डाच्या वतीने आणि समाज बांधव या नात्याने नवनिर्वाचित नगरसेवक मा. संजय शेषराव ऊमाळे आणि कु. अर्पिता शरद ऊमाळे यांचा संयुक्त सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केला.
समाज बांधवां सोबतचं विविध सामाजिक संघटना, आणि संस्थेच्या वतीने सुद्धा नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार संपन्न झाला. संस्था चालक, सावित्रीबाई मागासवर्गीय बहूऊद्देशिय शिक्षण संस्था सातरगांव यांच्या वतीने मा. भास्कर भोजने सर. —- बहूऊद्देशिय शिक्षण संस्था मांडवा यांच्या वतीने प्रा. विनोद ऊपर्वट सर.सम्राट अशोका फांऊडेशन बाळापूर यांच्या वतीने मा. शुभम तिडके. ड्रिम स्केअर अकादमी ( कोचिंग क्लास.) बाळापूर यांच्या वतीने प्रा. विश्वदिप वानखडे सर. यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
धनेगांव चे माजी सरपंच मा. नाजूकराव इंगळे, सातरगांव चे सरपंच मा. शिवा पांडे. पारस सर्कलच्या वतीने मांडोलीचे आयु. नागेश वानखडे वंचित बहूजन आघाडीचे सर्कल महासचिव. शेगांव येथिल अॅड. प्रकाश वाकोडे साहेब. भिकूनखेड येथील अॅड. प्रकाश वानखडे वकील साहेब. यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला…!!
बाळापूर शहरातील कासारखेड विभागाच्या वतीने आयु. सतिश तायडे सहपत्नीक आणि आयु. राहूल तायडे माजी. न. पा. उपाध्यक्ष यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
लोटणापुर या विभागाच्या वतीने मेजर गुलाबराव ऊमाळे, दिलीप ऊमाळे, नागेश हिवराळे, प्रल्हाद कांबळे,संदिप खरे ठेकेदार, आणि संपूर्ण महिला संघाने शाल पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला…!!
काळबाई वेस या विभागाच्या वतीने आयु. दादाराव गाडेकर. अशोक नगर मधील आयु. महादेव राव वाकोडे, नाईक नगर मधील. आयु. नंदू नाईक. नवानगर मधील शरद ऊमाळे, बेलदार पुरा विभागाच्या वतीने मा.मेजर सुभेदार माणिकराव सिरसाट यांनी तथा माजी सैनिकांच्या वतीने मा.अमर खंडारे, संतोष ऊपर्वट,आणि त्यांचे माजी सैनिक सहकारी या सर्वांनी नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार केला…!!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मेजर गुलाबराव ऊमाळे यांनी आयु. नाजूक राव इंगळे प्रा. विनोद ऊपर्वट सर यांनी शौर्य दिनचे महत्त्व विषद केले. मा.भास्कर भोजने सरांनी अध्यक्षीय भाषणातून नवनिर्वाचित नगरसेवकांना कर्तव्याची जाणिव करुन दिली, आभार प्रदर्शन आयु. दिलिप ऊमाळे यांनी केले…!!
