धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयात नुतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी सदिच्छा भेट दिली.व विद्यालयातील सर्व विभागांची व चालू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री संजय लोखंडे व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.शुभांगी सुधीर सस्ते यांना शाल पुष्पगुच्छ व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री चांद भाई शेख व येडशीतील युवा उद्योजक श्री तानाजी जाधव, पर्यवेक्षिका श्रीमती नाईकनवरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य श्री संजय लोखंडे यांनी आपल्या जडण घडणीत जनता विद्यालय येडशी चा सिंहांचा वाटा असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी काळाची पावले ओळखून खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. शाळेने जे विविध उपक्रम राबविले व गुणवत्ता विकासासाठी शाळेत जे उपक्रम राबविले जातात त्यांचे कौतुक केले. यापुढे शाळा आणि संस्थेच्या सर्वच विधायक कामासाठी आपण कर्मवीर परिवाराचा एक घटक म्हणून कायम सोबत असू अशी ग्वाही दिली. तसेच काही सूचना केल्या.
यावेळी सर्व विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो. 9922764189
