घोटाळेबाजांवर ती कठोर कारवाई करण्याची शाम झलवार यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील
अजिंठा : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या सावलीत वसलेल्या गावातील पद्मवंशी तेली समाजाच्या गायमुख स्मशानभूमीच्या विकास निधीत 11 लाख 32 हजार रुपयांचा मोठा अपहार झाल्याचा खळबळजनक आरोप मीडिया अधिकार मंचचे प्रदेश अध्यक्ष श्याम झलवार यांनी केला आहे.
कागदावर लाखोंचा खर्च दाखवून प्रत्यक्षात समाजाची दिशाभूल केल्याप्रकरणी दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून काळ्या यादीत टाकावे, अशी रोखठोक मागणी त्यांनी केली आहे.

अजिंठा येथे तेली समाजाची 500 ते 600 घरे आहेत. समाजबांधवांचा अंत्यविधी गायमुख स्मशानभूमीत केला जातो. या स्मशानभूमीच्या विकासासाठी दि. 27/06/2023 च्या प्रोसिडिंग बुकमध्ये विषय क्र. 3, 25/15 योजनेअंतर्गत डोंगरी भागासाठी 11,32,000/- रुपये मंजूर झाल्याचे नोंदवले आहे. शाम झलवार यांचा असा आरोप आहे,

प्रत्यक्षात काय? समाजाची लोकवर्गणी
मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. स्मशानभूमीत पिकशेड नाही, खुर्च्या नाहीत, सिमेंट रस्ता नाही, सुशोभिकरणही झालेले नाही. हे सर्व काम पद्मवंशी तेली समाजाने लोकवर्गणीतून 4 ते 5 लाख रुपये उभे करून केले आहे, असा ठपका झलवार यांनी ठेवला.
पिकशेड, खुर्च्या, सिमेंट रस्ता, सुशोभिकरण

  1. कागदी खर्च: 11,32,000/- रुपये, 25/15 योजना, दि. 27/06/2023
  2. प्रत्यक्ष खर्च: 4-5 लाख रुपये, समाजाची लोकवर्गणी
  3. तफावत: काम न करताच पूर्ण बिल उचलल्याचा आरोप
  4. संशयित: बांधकाम उपविभागीय अभियंता जि.प., पंचायत समिती सिल्लोड, ग्रामविकास अधिकारी, सरपंच अजिंठा ]

अधिकारी-संगनमताचा गंभीर आरोप
या संपूर्ण प्रकरणात वरील अधिकारी व सरपंच यांनी संगनमत करून स्टिमेंट व एम.बी. नुसार काम न करताच बोगस बिले काढली. शासनाची दिशाभूल करून शिस्तभंग केला, असे झलवार यांनी स्पष्ट केले.
“पद्मवंशी तेली समाज देशात नावलौकिक असलेला आहे. त्याच समाजाच्या स्मशानभूमीत हा अपहार करणे म्हणजे मृत्यूशय्येवरही फसवणूक करणे आहे,” अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या प्रकरणी ग्रामविकास मंत्री मुंबई, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक, बांधकाम विभाग व गटविकास अधिकारी सिल्लोड यांच्याकडे पुराव्यासहित तक्रार दाखल करण्यात आली आहे.
“लवकरात लवकर चौकशी करून स्मशानभूमीचे काम पूर्ण करावे. दोषींना निलंबित करून काळ्या यादीत टाकावे. कारवाई न झाल्यास मीडिया अधिकार मंचची संपूर्ण टीम मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. छत्रपती संभाजीनगर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी.”
श्याम झलवार, प्रदेश अध्यक्ष, मीडिया अधिकार मंच,

प्रशासनाने आता तरी डोळे उघडून मृतांच्या जागेवरचा हा जिवंत घोटाळा थांबवावा, अशी संतप्त मागणी समाजबांधव करत आहेत.

एन. टीव्ही. न्यूज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *