मुंबईत आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, मानवी मनोरे रचताना विविध सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये २२ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारी १२ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांतील जखमी गोविंदांची ताजी स्थिती समोर आली आहे. शहर भागातील रुग्णालयांमध्ये २० गोविंदा जखमी झाले असून, सर्व २० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूर्व उपनगरातील रुग्णालयांमध्ये एक गोविंदा जखमी झाला असून, त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात एक गोविंदा जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अशाप्रकारे मुंबईतील एकूण जखमी गोविंदांची संख्या २२ असून, त्यापैकी २१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एका गोविंदावर अद्याप उपचार सुरू आहेत.

एकूण आकडेवारी :
जखमी — २२
उपचार सुरू — ०१
डिस्चार्ज — २१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *