गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. स्वतःच्या हाताने बाप्पाच्या मूर्ती घडवत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला.विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. मूर्ती तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मूर्तीकलेचा अनुभव मिळतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्वही समजले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *