आमदार म्हणजेच एखाद्या मतदारसंघातुन जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनीधी.लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे असून हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य.उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा मतदार संघातील शिवसेना विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले,लोकांमध्ये आमदार म्हणून न वावरता विकासाभिमुख आपलं हक्काचं माणूस, “जनसेवक” म्हणून आपले कर्तव्य बजावताना दिसून येतात. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले हे स्वतः शिवसैनिकांची फळी निर्माण करीत अठरापगड जातीत मिळून मिसळून सर्वांचे सुख-दुःख जाणून दिलासा देणारे म्हणून जनसेवक म्हणून उमरगा लोहारा मतदार संघात प्रख्यात आहेत.

कोरोना नावाचा एक नवीनच विषाणू आपल्या भारतात थैमान घालत असल्याचे वृत्त मिळताच आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तत्परतेने दि.०८ मार्च २०२० रोजी उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व खाजगी व शासकिय डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेवुन कोरोना प्रतिबंधक उपायोजना करण्याच्या अनुषंगाने बैठकित सर्वांशी विचारविनिमय करून प्रत्येकाला “कोरोनाचे”गांभीर्य लक्षात आणून दिले आणि ठोस उपाययोजना आखण्याचे आदेश दिले.दरम्यान ते स्वतः कधीही स्वस्थ न राहता लागलीच दि.१८ मार्च २०२० रोजी सर्व प्रशासकिय अधिकारी व व्यापारी यांच्यासह बैठक घेवुन उमरगा-लोहारा तालुक्यातील सद्यस्थीती व उपायोजनांचा आढावा घेतला.तर दि.२३ मार्च २०२० रोजी उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी बैठक घेतली. तसेच स्पर्श ग्रामीण रूग्णालय सास्तूर येथील आयसोलेशन वार्डची पाहणी केली.केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केल्याने हातावरच पोट असणारे, मजूर, कामगारांवर उपासमारीचे प्रसंग ओढवले गेले होते ही बाब लक्षात घेऊन,दररोज २०० गरीब, गरजु, विधवा, बेघर कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने मोफत जिवनावश्यक वस्तुंचे
किट वाटप करण्यात येत होते,त्यावेळी सुमारे ३००० कुटुंबांना वाटप झाल्याने भुकेजलेल्याना/बेरोजगारांना मोठा दिलासा भेटला होता जे स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. तसेच विविध सामाजिक संस्थांना आवाहन करुन त्यांच्याकडुनही मदत मिळवून दिली जात होती.लॉकडाऊन काळात प्रवासी वाहनांची अडचणी व रूग्णांची गरज पाहता तालुक्यातील गरजु रूग्णांसाठी शिवसेनेच्या वतीने दोन मोफत रूग्णवाहीका सुरू करण्यात आल्या, फोन करा रुग्णवाहिका आपल्या दारी असा नारा आमदार चौगुले यांनी सर्व जनतेला दिला यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा झाला.दरम्यान साद-प्रतिसाद आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आवाहन केल्यानुसार गरजु कुटुंबांना मदत करण्यासाठी उमरगा व परिसरातील विविध संस्था व दानशुर व्यक्ती पुढे येत होते.

कोरोना हा जणू एक युद्ध होता ज्याचे मुख्य योद्धे जनसेवक म्हणून आमदार चौगुले हे क्षणाक्षणाला जनतेला अनुभवास येत होते. युवा सेनेचे नेते किरण रविंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गरजु लोकांचा शोध घेवुन त्यांना जिवनावश्यक वस्तुंचे किट,प्रत्येक प्रभागात जाऊन दारापर्यंत जाऊन वाटप करण्यात येत होते.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी युवासेनेकडुन हेल्पलाईन सुरू करण्यात आली.जेणे करून आपल्या मतदार संघातील गरजु रूग्णांना तात्काळ मोफत रूग्णवाहीका उपलब्ध व्हावी आणि पोटभर अन्न मिळावं कुणाचीही उपासमार होता कामा नये याकडे विशेष लक्ष जनसेवक श्री चौगुले यांचे होते.तसेच लॉकडाऊन काळात पोलीस कर्मचारी, सफाई कामगार व इतर गरजु लोकांना शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातुन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात केवळ आपल्या मतदार संघातील लोकांचीच जबाबदारीचे आव्हान आमदार चौगुले यांच्यावर न्हवते तर परराज्यातुन (तेलंगणातुन)आलेल्या मजूर कामगारांची जबाबदारी आमदार चौगुले यांनी सर्वांना विश्वासात घेऊन चोख निभावली हे संबंध महाराष्ट्राने पाहिले.महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर अडकलेल्या परराज्यातील सुमारे ५०० ते ६०० नागरिकांशी आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण रविंद्र गायकवाड यांनी संवाद साधुन त्यांना धीर दिला व प्रशासनाच्या माध्यमातुन त्यांची संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात निवास व भोजनाची व्यवस्था झाली.

दि.२८ मार्च रोजी तहसिल कार्यालय उमरगा येथे बैठक घेवुन उमरगा लोहारा तालुक्यातील home quarantine व आयसोलेशन वार्ड आरक्षीत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान लॉकडाऊन मुळे बर्याच जणांचे कंबरडे मोडले होते त्यामुळे बरेच लोकांना महागाईचा सामना ही करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन लागलीच उमरगा शहरात शिवभोजन थाळी ला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला अगदी5 रुपयांमध्ये चपाती,भात,दोन भाज्या आणि वरण असे पोषक आहार या माध्यमातून भेटू लागल्या. नंतर काही महिन्यांतच पाच रुपये पण न घेता अगदी मोफत ही सदर ‘शिवभोजन थाळीचा’ आस्वाद उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेला चाखता आला,जे आजही उमरगा व परिसरातील जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.

कोरोना आपल्या भागात येऊ नये यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखतानाच इतर जिल्ह्यातून परतलेल्या लोकांना विलगिकरन कक्षात ठेवून त्याची देखरेख करणे, तसेच लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि आपल्या शिवसैनिकांची निर्माण केलेली फळी चे रूपांतर सामाजिक कार्यकर्त्यात करणे असे नानाविध स्वरूपाचे परिश्रम आमदार चौगुले यांनी घेत जनसेवक ही पदवी प्राप्त केली अक्षरशः जेंव्हा तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळुन आले तेंव्हा क्षणाचाही विलंब न करता ‘बलसुर’ व ‘धानोरी’ या गावांना भेटीदेवुन आवश्यक त्या उपायोजना करणेबाबत प्रशासनास सुचना केल्या.आणि जनतेशी संवाद साधला, तेंव्हा गावकऱ्यांमध्येही आत्मविश्वासाची बांधणी झाली. मतदारसंघात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळुन आल्यानंतर तात्काळ मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे,तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांच्याकडे विविध उपायोजना करणेबाबत पत्रव्यवहार केला.तर मरकजच्या धर्तीवर उमरगा लोहारा तालुक्यातील मुस्लीम समाजातील प्रमुख व्यक्ती व प्रशासनासोबत बैठक घेत मुस्लिम बांधवांना विश्वासात घेऊन सहकार्य करण्याबाबत विनंती केली. दरम्यान च्या काळात स्वस्त धान्य दुकानांना भेटी देवुन धान्य मिळणाऱ्या सधन कुटुंबांनी गरजु कुटुंबांना धान्य वाटप करण्याचे आवाहन केले. यानुसार अनेक जण गरजूंना मदत करन्यास पुढे आले.जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासमवेत बैठक घेवुन जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढु नये यासाठी तात्काळ उपायोजना करणे, इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा केली आणि तहसिल कार्यालय, उमरगा येथे मतदारसंघातील सर्व शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शिवसेनेकडुन मोफत १५०० सॅनीटायझर बॉटलचे वाटप करण्यात आले.आपल्या मतदार संघातील प्रत्येक नागतिकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढण्याहेतु उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व कुटुंबीयांना प्रत्येक प्रभागात जाऊन शिवसैनिकांनी अर्सेनिक अल्बम-३० व कफ सिरप मोफत वाटप केले आणि रुग्णाची वाढती संख्या व त्यांना आवश्यक ऑक्सिजन चा नियमित पुरवठा होण्याहेतु शिवसेनेच्या माध्यमातून उमरगा उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला तर उमरगा लोहारा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णाची गरज ओळखून जवळपास 10 ऑक्सिजन कोंसीट्रेटर ची पूर्तता करण्यात आली.
एकंदरीत पाहता कोरोना महामारी हे संकट तर आहेच पण ही एक परीक्षा जणू ठरली ती त्या-त्या आमदारांची आपापल्या मतदारसंघात. आमदार म्हणून लोकप्रतिनिधी तर असतात पण “जनसेवक” म्हणून वावरणारे लोकप्रतिनिधी अगदी बोटावर मोजण्याइतकेच त्यात आमदार ज्ञानराज चौगुले हे प्रामुख्याने समोर येतात हे तितकेच खरे…!कोरोना या नव्याने आलेल्या महामारीमध्ये जातींन लक्ष देत प्रशासनाला वेळोवेळी उपाययोजना आखण्याबाबत आढावा बैठकी घेत आपल्या मतदार संघात कुणीही कोरोनाच्या संसर्गात येऊ नये यासाठी नेहमीच धावपळ केली त्यामुळेच तर उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त जिल्ह्याचा उद्दिष्ट लवकरच पूर्ण झाले.
ना चेहऱ्यावर कसला गर्व.. ना वागण्यात तथा वर्तणुकीत कसला रुबाब..!सर्वसामान्य जनतेच्या हाकेला तत्परतेने प्रदिसाद देणारे उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार खरच आपल्या लोकाभिमुख कार्यातून जनसेवक ठरत आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही..!

HappyBirthaday #Amdar #DnyanrajChougule #Osmanabad #Omerga #Lohara #Shivsena
✍🏻शब्दांकन
सचिन प्रकाशराव बिद्री
(उमरगा-उस्मानाबाद)