गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावा जवळ पोळ्याच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत पन्नास हजाराची दारू जप्त केली आहे
हरिजन हलदार राहणार सुभाषग्राम असे आरोपीचे नाव आहे आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुमारशिंग राठोड याचा मार्गदर्शनात गोपनीय माहितीच्या आधारे सापडा रचून दुचाकी सह 50 हजाराची दारू पकडण्यात आली आहे यात 500 निपा दारू पकडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमारशिंग राठोड यांनी दिली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश जगले व त्यांचे सहकारी करीत आहे महाराष्ट्र दारू कायदा 65 अन्वये प्रमाणे आष्टी पोलीस स्टेशन येते गुन्हा दाखल करण्यात आला या वेळी आरोपी हरिजन हलदार मु पोस्ट सुभाषग्राम याला अटक करण्यात आली आहे