section and everything up until
* * @package Newsup */?> स्टारबस वाहक,चेकरचा महिलांसोबत अरेरावीची भाषाखापरखेडा बस मधील प्रकार | Ntv News Marathi

नागपूर-प्रतिनिधी विनोद गोडबोले
खापरखेडा- नागपूर स्टारबसमध्ये वाहक आणि चेकरचा महिलांसोबत अरेरावी भाषेचा वापर केला जात आहे.ज्यामुळे महिलांमध्ये रोष निर्माण झाला आहे.प्रवाशी महिला बस क्र.एमएच-४०-सीडी-९३९५ आणि एमएच-४०-सीएम-०५०६ स्टार बसने खापरखेडा , नागपूर बस ने प्रवास करीत असतांना ड्रायव्हर आयडी-५०१४२ ने चेकर -संतोष वराडे व वाहक नेहमी महिलांसोबत उद्धाट भाषेचा अरेरावी पद्धतीने वापर करीत धमकी देत असल्याची ओरड महिला वर्गात होत आहे.खापरखेडा परिसर औद्योगिक क्षेत्र असल्याने विज केन्द्र, वेकोलि खाणी,शाळा विद्यालये, महाविद्यालय, पोलीस स्टेशन,पोस्ट ऑफिस,दवाखाने, बाजारपेठ असल्याने दररोज विद्यार्थी,शिक्षक, कर्मचारी, अधिकारी,शेतकरी व अन्य नागरिक महिला,मुले,मुली दररोज बसने प्रवास करीत असतात.एकीकडे अपंग, महिला व वृद्धांसाठी सिट राखीव असतांना बसण्याचा सिटसाठी उद्धाट भाषेचा वापर करीत असतात शिवाय बस थांब्यावरुन सुद्धा महिलांना बस मध्ये घेण्यास कंडक्टर मनमानी करत असल्याने महिलांना बस मधून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे.संबधित प्रबंधनाने , व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज असुन मनमानी करणाऱ्या संबंधित बस चालक व वाहकाला तात्काळ समज देऊन विनंती थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबवण्याची सक्त सूचना करावी. अन्यथा त्यांना चांगला धडा शिकवण्यात येईल, असा इशारा महिला प्रवाशांनी दिला आहे.त्याचप्रमाणे खापरखेडा परिसराचा मिलन चौक,अण्णा मोड,व शेवटचा थाबापर्यत वर्दळीचा असुन बसेस सुसाट वेगाने जात असतात,वेग मर्यादांवर नियंत्रण ठेवून बस चालवावी असे नागरिकांचे म्हणणे आहे, अन्यथा अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकच बस दोन,तीनदा चेकिंग का?
एकाच बसची दोन तीन वेळा चेकर चेकिंग करीत असल्याने कार्यालयीन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळवरच पोहचता येत नाही.म्हणून ड्युटीवर,शाळेत पोहचायला उशीर होत असतो.ज्यामुळे अडचण निर्माण होत आहे अशी विद्यार्थी , शिक्षक कर्मचाऱ्यांची ओरड सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *