जामखेड (प्रतिनिधीनंदु परदेशी )

जामखेड – तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचे २०२५-२०३० करीता आरक्षित सरपंचपदासाठीचे आरक्षण काढण्यात आले. सरपंचपदाचे आरक्षित जागा चक्रानुक्रमे व सोडत पध्दतीने चिठठ्या टाकून आरक्षित करण्यात आल्या.

बुधवारी (ता.२३) सकाळी ११ वाजता जामखेड तहसिल कार्यालयात सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्गातील सरपंचाची पदे तसेच सर्वसाधारण जागा आरक्षित करावयाची कार्यवाही चक्रानुक्रमे व सोडत पध्दतीने चिठठ्या टाकून आरक्षित करण्यात आल्या.

तालुक्यात सरपंचपदाचे आरक्षण याप्रमाणे आहे. सरपंचपदासाठी अनुसुचीत जातीसाठी आरक्षित ग्रामपंचायती शिऊर, दिघोळ , पाटोदा , साकत , वाघा, जातेगांव

सरपंचपदासाठी अनुसुचीत जमातीसाठी आरक्षित ग्रामपंचायती पिंपरखेड

सरपंचपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती अरणगांव, आनंदवाडी, जवळा, झिक्री , धनेगांव , कवडगाव पिंपळगांव आळवा, मतेवाडी, बोर्ले, वाकी, सातेफळ , सारोळा, तेलंगशी, पाडळी, डोणगांव , देवदैठण

सरपंचपदासाठी सर्वसाधारण पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती मोहरी , आघी, घोडेगांव, पिंपळगांव उंडा, नायगांव, खुरदैठण नान्नज, सोनेगांव, फक्राबाद , जवळके , धोडपारगांव, मोहा, हाळगांव, , बांधखडक , राजुरी , नाहुली , धामणगांव , धानोरा , खर्डा , रत्नापुर , सावरगांव , खांडवी , बाळगव्हाण
आपटी, तरडगांव, कुसडगांव, राजेवाडी , चोभेवाडी , गुरेवाडी, जायभायवाडी, मुंजेवाडी, पोलेवाडी, बावी, लोणी अशा ग्रामपंचायती आहेत.

दरम्यान ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाला महिलांसाठीचे आरक्षण गुरूवारी (ता.२४) कर्जत येथे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता निश्चित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले.

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हाप्रतिनिधी
मो नं 9765886124