जामखेड, दि. 5 जामखेड शहरातील तपनेश्वर भागात मैत्रीणींन सोबत घेऊन रहाणारी नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील हीने खर्डा रोड वरील एका हॉटेलच्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नृत्यांगना हीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत

मयत नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील, वय ३५ वर्षे रा. तपनेश्वर गल्ली. (मुळ रा. कल्याण, जिल्हा. ठाणे) ही जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करीत होती. सध्या ती आपल्या इतर मैत्रीणी सोबत तपनेश्वर भागात भाड्याने रूम करुन रहात होती. गुरुवार दि ४ डिसेंबर रोजी सकाळी आपल्या रूम मधिल मैत्रीणींना मी बाजारात जाऊन येते असे सांगुन दिपाली बाहेर निघुन गेली. दुपारी बराच वेळ होऊनही ती परत आली नसल्याने तीच्या मैत्रीणींनी दिपाली हीस फोन करुन संपर्क केला मात्र तीचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तीच्या मैत्रीणींनी ती ज्या रीक्षाने गेली त्या रीक्षावाल्यास विचारले असता त्याने सांगितले की मी दिपाली हीस खर्डा रोडवरील हॉटेल साई लॉज या ठिकाणी सोडले आहे. यानंतर तीच्या मैत्रीणी साडेपाच वाजता लॉजकडे गेल्या असता लॉजच्या रुमला आतुन लॉक केले होते. यानंतर बेटरने दुसऱ्या चावीने रुमचा दरवाजा उघडला असता दिपाली गोकुळ पाटील हीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसुन आले. यानंतर घटनास्थळी पोलिस व इतरांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जामखेड ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करीत असलेल्या दिपाली हीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजु शकले नाही. याप्रकरणी तिची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हीने दिलेल्या खबरी वरुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करीत आहेत.

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *