फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपिर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सामान्या नागरीकांच्या मोटार सायकल चोरी करून स्वताचे उदरनिर्वाह करणा-या इसमास अटक करून गुन्हयातील चोरी गेलेले मोटार सायकल जप्त करण्यात आले व आरोपीस जेरबंद करण्यास यश आले.
मंगरूळपिर पोलीस स्टेशन येथे दिनांक ०१/०४/२०२६ व ०३/०४/२०२६ रोजी फिर्यादी नामे विनोद तुळशीराम जाधव व अश्विन शिवचंद चव्हाण दोन्ही मंगरूळपिर असुन त्यांनी समक्ष पोलीस स्टेशन मंगरूळपिर येथे हजर येवुन जबाणी रिपोर्ट दिला की, फिर्यादी नामे विनोद तुळशीराम जाधव यांची हिरो होन्डा फॅशन प्रोव्ह कंपनीची काळयारंगाची मो.सा क एमएच ३० ए आर १७८७ किंमत अंदाजे ३०.००० रू दिनांक ०१/०४/२०२६ रोजी जांब रोड मंगरूळपिर येथे तक्रारदार यांचे राहते घराजवळुन व फिर्यादी नामे अश्विन शिवचंद चव्हाण यांची हिरो होन्डा फॅशन प्रोव्ह कंपनीची काळयारंगाची मो.सा क एमएच ३७ क्यु ६३७४ किंमत अंदाजे ३०.००० अशा वर्णाची दिनांक ०३/०४/२०२६ रोजी बस संस्थानक मंगरूळपिर परीसरातुन चोरी गेले वरून अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३०३ (२) bns act 2023 अन्वये गुन्हे दाखल करून तपास डि.बी.पथक मंगरूळपिर यांनी घेतला.सदर गुन्हयाचे तपासांत मंगरूळपिर शहर परीसरातील ठिकठिकाणचे सिसिटिव्ही फुटेज पाहणी करून गुन्हयात चोरी गेलेला माल व अज्ञात आरोपीचा शोध सातत्यने घेवुन गोपणीय बातमीदारद्वारे गोपणीय माहीती गोळा करून संशयीत इसम यांचे कडुन सखोल चोकशी करून संशयीत इसमाने वर नमुद गुन्हयातील दोन्ही वाहान चोरी केल्याचे कबुली दिल्यांने व निष्पन्न झाल्याने आरोपी नामे शुभम पुंडलिक मनवर वय १९ वर्षे रा. निंबी ता. मंगरूळपिर यांना नमुद गुन्हयात अटक करून आरोपी कडुन मेमोरंडम पंचनामा द्वारे वरील दोन्ही वाहन गुन्हयात जप्त केली असुन मंगरूळपिर पोलीसांनी अशी उत्कुष्ठ कामगीरी बजवलेली आहे.सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अनुज तारे व अपर पोलीस अधिक्षक लता फड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपिर विशाल क्षिरसागर पोलीस निरीक्षक किशोर शेळके पोलीस स्टेशन मंगरूळपिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मंगरूळपिर चे सपोनि / गणेश काळे पोहवा / ३० संजय घाटोळे पोशि/ ९१४ प्रमोद वानखडे पोशि/ २७५ रफिक मांजरे पोशि/ ३४५ प्रविण माळकर पोशि/१४११ गजानन ब्राहमण पोशि/ १३९३ मनीष आडे व चालक पोशि/१०५७ आशिष रघुवंशी यांनी केली आहे.
