आज सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रांगणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सविता सिनगारे यांच्या शुभहस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व ध्वजारोहण करण्यात आले आले.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनिल मेढे, उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात बुद्ध जयंती कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोड शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव डॉ.राहुलभाऊ म्हस्के होते तर महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती डॉ.सविता सिनगारे मॅडम, उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे, उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्या श्रीमती डॉ.सविता सिनगारे मॅडम यांनी १मे महाराष्ट्र दीन, कामगार दिन आणि बुद्ध जयंती निमित्त उपस्थित सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुलभाऊ म्हस्के यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. प्रा. अनिल वैद्य यांनी उपस्थितांकडून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून घेतले. प्रो.डॉ संतोष पहारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.संदीप पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *