फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी परिसरातील मंगलधाम येथे पोलिसांनी धाड टाकून तब्बल १९ लाख
१५ हजार २०० रुपयांचा गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून
वृत्त लिहेपर्यंत कारवाई सुरू होती.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख राजिक शेख मोहम्मद उर्फ सोनू (वय २४, रा. ग्राम शेलू,ह.मु. मंगलधाम, हुडको कॉलनी, वार्ड क्रमांक १,मंगरूळपीर, जि. वाशिम) याच्या ताब्यातून गांजा सदृश्य
अमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे एकूण वजन ३८.३०४
किलोग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १९,१५,२०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी
पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(ग) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई योगेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा गजानन
झगरे, राहुल व्यवहारे, गजानन गोटे, महिला पोहवा सुषमा तोडकर, पो. ना. ज्ञानदेव म्हात्रे, दिलीप देवकते,
पो. अं. राजकुमार यादव, भूषण ठाकरे, तुषार ठाकरे,अमोल इरतकर, चालक सुनील तायडे व श्याम इंगळे
यांच्या पथकाने केली.
