जामखेड तालुक्यातील नान्नज येथील रहिवासी गफुर अब्दुल पठाण (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नान्नज परिसरासह जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वर्गीय गफुर पठाण हे अत्यंत प्रेमळ व मायाळु स्वभावाची व्यक्ती म्हणून परिचीत होते त्यांनी आपल्या खडतर आयुष्यात अनेक संकटांचा सामाना करत केवळ काबाड कष्ट हेच भांडवल समजून आपला संपुर्ण परिवार घडवला तसेच प्रत्येक सामाजिक धार्मिक कामात आपला सहभाग देत शक्य ते योगदान केले त्यांचा नाते गोते परिवार हा दांडगा होता सर्वांशी प्रेमळ पणाने वागण्या च्या त्यांच्या खुबी मुळे त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यकत केली जात आहे ते पत्रकार समीर शेख यांचे आजोबा तर रसुल अहमद आणि गनीभाई पठाण यांचे वडील होते तसेच त्यांना तीन मुली आणि नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे.
दिवंगत गफुर अब्दुल पठाण यांच्या पार्थिवावर गुरुवार, दिनांक ४ जून रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता नान्नज येथील जामा मस्जिदच्या पाठीमागील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात आणि हजारों च्या उपस्थित साश्रु नयनाने अत्य संस्कार करण्यात आले
नंदू परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124
