आयुक्त मुंढे यांच्या रडारवर आता मेडिकलवाले;फार्मासिस्ट नसलेली मेडिकल दुकाने सील करा !

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील बहुतांश मेडिकल रामभरोसे असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.अनेक मेडीकलवर पाञ फार्मासिस्टच नसुन इतरांच्या भरवशावर औषधे विक्री होत असल्याची चर्चा असुन अशा मेडिकलवर अचानक धाड टाकुन चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.


राज्यभरातील औषध विक्री व्यवस्थेवर आता अधिक कडक नियंत्रण आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. औषध विक्रीसाठी पात्र फार्मासिस्ट उपस्थित नसतांना सुरू असलेल्या मेडिकल दुकानांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मुंडे यांनी दिले आहेत.औषधे ही सामान्य वस्तू नसून ती थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने औषध विक्री करताना पात्र आणि नोंदणीकृत फार्मासिस्ट उपस्थित असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी फार्मासिस्टशिवाय मेडिकल दुकाने सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंडे यांनी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना विशेष तपास मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. तपासादरम्यान फार्मासिस्ट अनुपस्थित आढळल्यास संबंधित मेडिकल दुकान तात्काळ सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच बनावट कागदपत्रे, दुसऱ्या फार्मासिस्टच्या नावाचा गैरवापर, परवान्याच्या अटींचे उल्लंघन आणि नियमबाह्य औषध विक्री करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मंगरुळपीर येथेही नियमबाह्य मेडिकल सुरु असुन अशा मेडीकलवर आकस्मिकपणे तपासणी करुन दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *