वाशिम : धानोरा ते अनसिंग मार्गादरम्यान झालेल्या अपघातात कुंभी येथील रघुनाथ शेळके हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर व इतर प्रहार सेवकांनी तातडीने दवाखान्यात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले.

कुंभी येथील रहिवासी असलेले रघुनाथ शेळके सोमवारी (दि.२०) धानोरा ते अनसिंग मार्गावरून मोटरसायकलने प्रवास करीत असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटर सायकलवरील ताबा सुटून त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर जखमा झाल्या. ही बातमी प्रहार जनशक्ती पक्षाचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर व प्रहार सेवक गोपाल भेंडेकर, पप्पू भेंडेकर, राम ठाकरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रहार सेवकांनी अपघातग्रस्त रघुनाथ शेळके यांना आपल्या गाडीने दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना स्वतःच्या गाडीने कुंभी येथे त्यांच्या घरी सोडून दिले. धानोरा ते अनसिंग या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या मार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरुच आहे. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.
तर प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल – भेंडेकर
धानोरा ते अनसिंग हा मार्ग मंगरुळपीर कडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. तथापि मागील काही वर्षांपासून या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, या मार्गाची दुरवस्था झाली असल्याने वारंवार अपघात होत आहेत. यामुळे प्रशासनाने या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर यांनी केली असून याची दखल न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आह
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम