• नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण
  • सर्व पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचेही वाटप
  • बाळासाहेब भवनात विशेष कार्यक्रम संपन्न
  • शिवसेना संघटना वाढविण्याचे मार्गदर्शन
  • जनतेपर्यंत विचार पोहोचवण्याचे आवाहन
  • कोल्हापूर आणि ठाण्यात नव्या नियुक्त्या

MUMBAI | मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन, नरिमन पॉईंट येथे शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार, माजी आमदार रुपेश म्हात्रे आणि दक्षिण मुंबईचे सह लोकसभा प्रमुख दिलीप नाईक यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष व वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ उपस्थित होते.
किरण पावसकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संघटनेचे विचार तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावेत, संघटना वाढवावी आणि जनतेला मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा उपाध्यक्षपदी अमित पै. यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अमर ढेरे यांची जिल्हा संघटक, क्रीडा विभागपदी, सुहास साळोखे यांची जिल्हा सचिवपदी, श्रीकांत माजगावकर यांची सहसचिवपदी, तर चंद्रकांत वडर आणि भूषण मिटके यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
ठाणे पाचपाखाडी विधानसभा सचिवपदी मनिषा म्हात्रे आणि सहसचिवपदी शीतल धुमाळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यासह सर्व पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या राज्य प्रवक्त्या सुषमा राऊत, ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्षा स्मिता देवकर पाटील, वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई सचिव डॉ. नवीन शेवाळे, रायगड जिल्हाध्यक्ष सुखदेव सस्ते, ठाणे शहर सचिव अनिल खेताडे, जुईनगर, नवी मुंबईचे सचिव धनाजी जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

एनटीव्ही न्यूज मराठी | मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *