उस्मानाबाद : तालुक्यातील लातुर बार्शी रोड लगत असलेल्या येडशी येथिल गणेश मंगल कार्यालय येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संय़ुक्त उपक्रमाने उस्मानाबाद ग्रामिण पोलिस ठाणे अंतर्गत येणार्‍या ४६ गावातील ग्रामसेवक,सरपंच,पोलिस पाटील,तलाठी, ग्रामसुरक्षा दल, प्रतिष्ठित नागरीक बिट अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले

परिसरातील सर्व नागरीकांना एकाच वेळी मोबाईल कॉलद्वारे सावध करणे,सुचना देणे किंवा पोलिसांना बोलावण्यासाठी उपयोगी यंत्रणा या बद्दल माहिती देण्यात आली सदर कार्येक्रम कोरोणाचे नियम पाळून करण्यात आला . या वेळी ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रकल्प संचालक डि के बोरडे नाशिक,यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा या बद्दल तीन तास माहिती दिली या वेळी त्यांनी प्रत्येक गावामधील सरपंच, पोलिस पाटील,ग्रामसेवक यांना ग्रामसुरक्षा अॅप डाउन लोड कसे करायचा व कसा हाताळायचा या बद्दल माहिती दिली व दरोडा,बिबट्याचाहल्ला,सर्पदंश, पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला,आग जळिताची घटना,अपघात,घडल्यास 18002703600 ह्या नंबर वरुन तात्काळ संपर्क साधून मदत मिळेल असे त्यांनी सांगितले पोलिस दलाचा हा ९०१ वा कार्येक्रम आहे व त्यांनी उपस्थितांना चार प्रश्न विचारुन मार्गदर्शन केले व ध्वनिफित द्वारे प्रात्यक्षिके दाखविले सदर नंबर दहा वर्षापासून चालु केलेला आहे

ह्या यंत्रणेमधून माणुस चुकीचा कॉल प्रसारीत करु शकत नाही एकदा सुद्धा हि यंत्रणा अयश्वी झालेली नाही या कार्यक्रमात सहभागी350 पोलिस स्टेशन, 200 सरकारी कार्याेलय, सहभागी आहेत व याचा हजारो लोकांनी उपयोग केला असे त्यांनी सांगितले हा कार्येक्रम अतिशय उपयुक्त आहे या मध्ये विशिष्ट माहिती भेटल हे जर मी प्रशिक्षण चुकविले असते तर आपल्या गावाचाे नुकसान झाले असते चोवीस तास हि यंत्रणा आहे त्यामुळे घटना घडणार नाही १००% याचा आम्ही लाभ घेवु असे मत अंबेजवळगा येथिल सरपंच कुलकर्णी यांनी मांडले या वेळी उस्मानाबाद ग्रामिण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश शिंन्दे,यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्येक्रम यश्वी करण्यासाठी येडशी अौट पोष्ट येथिल व उस्मानाबाद ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी प्रय्तन केले या वेळी सरपंच,ग्रामसेवक,पोलिस पाटील,कॉमप्युटर अॉपरेटर, ग्रामसुरक्षा दल व येडशी येथिल पत्रकार व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते .

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी मो.9922764189

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *