वाशिम : येथील ऍड रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मालेगाव येथे कार्यरत शांतीलाल माणिकचंद बोहरा यांनी विधी पदव्युत्तर उन्हाळी २०२१ परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत एल .एल. एम विधी पदव्युत्तर अभ्यासक्रमात (८४.८६ /) टक्केवारी घेऊन सहावे स्थानाचा बहुमान मिळविला आहे .

या यशाकरिता राजस्थान शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई राठी व उपाध्यक्ष श्री शामसुंदरजी मुंदडा तसेच विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुशांत चिमणे यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाचा आलेख उंचावण्यास मदत होईल असे कौतूकगार या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना काढले असून या यशाचे श्रेय त्यांनी महाविद्यालयातील शिक्षकवर्ग यांना दिले आहे.. यावेळी महाविद्यालयातील प्रा संजय इढोळे ,प्रा सौ एल डि दाभाडे, प्रा डॉ सागर सोनी ,प्रा भाग्यश्री धुमाळे ,प्रा सज्जनसिह चंदेल ,डॉ प्रियंका चौधरी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी शांतीलाल बोहरा यांचे अभिनंदन केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *