उस्मानाबाद : उमरगा शहरात विश्वकर्मा जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. शहरातील सुतार समाज, गुर्जर क्षत्रिय समाज,सोनार बांधवांनी समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम शहरातील हनुमान मंदिर येथे विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.यावेळी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड,सचिन जाधव, विनोद कोराळे, दत्तात्रय सुतार, राजेंद्र सुतार, परमेश्वर सुतार, बाळासाहेब कौलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍड हरिकेश पांचाळ, दीपाली पांचाळ, विद्युलता सुतार,शिवसंग्राम प्रणित महिला आघाडीच्या पुणे सरचिटणीस ऍड पूजा पांचाळ, प्रमोद पांचाळ, मोहन पांचाळ आदींचा समाज भूषण पुरस्कार देत मान्यवरांच्या हस्थे सत्कार करण्यात आला तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले.तसेच ह.भ. प. राजेंद्र महाराज बिराजदार, गुगळगावकर यांचे भजन किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुनील पांचाळ,चंद्रकांत सुतार, लक्ष्मण सुतार, धनराज पांचाळ, मारुती पांचाळ, बालाजी पांचाळ, भरत पांचाळ, आणि चैतन्य पांचाळ आदींनी केला होता तर सोनार व्यापारी प्रभाकर वेदपठाक, दिलीप पोतदार, विष्णू महामुनी आदींचे कार्यक्रम यशस्वी होण्यास मार्गदर्शन लाभले.
(उमरगा : सचिन बिद्री)