वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार ग्रामपंचायतीने तालुका स्मार्ट ग्राम म्हणून प्रथम क्रमांक पटकावला.प्रशासनाच्यावतीने आणी जिल्हा परिषद चे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

ऊपक्रमशिल प्रशासन चालवणारे तालुक्यातील विकसीत आणी नेहमी लोकहितकेंद्री प्रशासन चालवणार्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार ग्रामपंचायतीला आता प्रशासनाकडुनही गौरविन्यात आले.आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना सन २०२०-२०२१ राबविन्यात आली.सन २०२०-२१ या वर्षात आर.आर.आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारीत निकषामध्ये ग्रामपंचायत शेलुबाजार ता.मंगरुळपीर जि.वाशिम यांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्यामुळे या शेलुबाजार ग्रामपंचायतील ‘तालुका स्मार्ट ग्राम’म्हणून जि.प.चे अध्यक्ष चंद्रकात ठाकरे आणी मान्यवरांच्या ऊपस्थीतीत गौरविन्यात आले.यावेळी शेलुबाजारच्या लोकप्रीय सरपंचा प्रमिलाबाई पवार यांचेसह पदाधिकारी आणी ग्राम प्रशासकीय कर्मचार्यांची ऊपस्थीती होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206