गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील कु.मीना येर्रा सिडाम वय 18 वर्ष हिची प्रेम प्रकरणातून हत्त्या करण्यात आली होती. संबंधित सिडाम परिवाराच्या घरी भेट देवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सिडाम परिवाराचे सांत्वन करत सदर परिवाराला आर्थिक मदत देण्यात आली
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,अहेरी नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,प.स.भामरागडचे माजी उपसभापती श्री.लालसु आत्राम, पेरमिलीचे माजी सरपंच श्री.प्रमोद आत्राम,पोलीस पाटील श्री.क्रिष्णा सिडाम,चिन्नू सड़मेक,गणेश नागपूरवार,दिनेश जुमडे,आदि उपस्थित होते.