गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव येथे अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. महागाव (खुर्द) गावात गावकऱ्यांना सभा घेण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने गावात सभा मंडप आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली.गावकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आ धर्मराव बाबा आत्राम यांनी त्वरित सभा मंडप मंजूर केले आणि नुकतेच त्यांनी सभा मंडपाचे भूमिपूजन केले.सभा मंडपाच्या कामाला सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसात गावकऱ्यांना सभा मंडपाचे काम पूर्ण होणार आहे. गावात कुठल्याही सभेचे आयोजन करताना या सभा मंडपात करता येणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केली.भूमिपूजन साठी आमदार गावात आले असता गावकऱ्यांनी त्यांचा जंगी स्वागत केले.भूमिपूजन कार्यक्रमात सरपंच श्रीहरी आलाम,गजानन रामटेके,गिरमा तलांडे,मधुकर आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.