गडचिरोली : अहेरी तालुक्यातील बोरी येथील किडनीग्रस्त व्यक्तीला उपचाराकरिता आर्थिक मदत हवी असल्याची माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच किडनिग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत केली.रजपुर प्याच येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेश गंगाधरीवार यांचे मोठे बंधू भीमन्ना गंगाधरीवार हे किडनी ग्रस्त असून पुढील उपचाराकरिता पैशांची आवश्यकता होती. सदर बाब माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी सामाजिक दायित्व निभावत घरी भेट घेऊन आस्थेने विचारपूर करून १० हजारांची आर्थिक मदत केली

अजय कंकडालवार हे जि.प.अध्यक्ष असतांना व आता पद नसतांनाही नागरिकांच्या मदतीला धावून येत आहेत. तसेच कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केल्यास आवर्जुन उपस्थिती दर्शवित असतात. त्यांच्या या कार्याचे, मदतीचे जनतेमध्ये कुतूहल होत असून निरंतर असेच कार्य अजय कंकडालवार यांच्या वतीने सुरू राहणार आहेत. आज केलेलया मदतीने किडनीग्रस्त व्यक्तीने तसेच कुटुंबाने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे धन्यवाद मानले आहे..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *