तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

(सचिन बिद्री:उमरगा)

उस्मानाबाद : उमरगा शहरातील असिफा मणियार या महिलेने उमरगा शहरातील काही खाजगी सावकारांच्या अवाढव्य आठवडी व्याजाला कंटाळून आपल्या लहान मुलींसह चक्क रमजान ईद ला आत्महत्या करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट येथील सौ कांबळे यांच्या घरी गेली सात वर्षांपासून लहान बाळासोबत भाड्याने राहत असून लोकांच्या घरी घरकाम(धुनी-भांडी) करून उपजीविका भागवते.या दरम्यान अर्थिक अडचणीत बाळाच्या दवाखाण्यासाठी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते.गेल्या चार वर्षांत घेतलेल्या मुद्दलपेक्षा अनेक पटीने व्याजाच्या स्वरूपात परतफेड करूनही संबंधित गुंड प्रवृत्तीच्या खाजगी सावकारांकडून घरी येऊन अश्लील शिवीगाळ करून मारहाण होत आहे, इतकेच न्हवे तर माझ्या घरातील भांडी उचलून जाणे व स्वयंपाक करायचा गॅस सिलिंडर सह टाकी पण उचलून घेऊन गेले आहेत.या खाजगी सावकारांच्या आठवडी व्याजाला मी कंटाळले असून त्यांच्या भीतीपोटी मी माझ्या मुलीला घेऊन घरात न राहता लपून फिरत आहे.आणि निश्चय केला आहे की रमजान ईद दिनी मी व माझी सहा वर्षाची मुलगी दोघे आत्महत्या करणार.या आमच्या सामूहिक आत्महत्येला केवळ उमरगा शहरातील खाजगी सावकार व प्रशासन जबाबदार राहील असेही या निवेदनात म्हटले आहे.पुढे म्हटले आहे की, या निवेदनात त्या खाजगी सावकारांचे नावे नमूद करण्यात आली नाहीत कारण ते सर्व माझ्या व माझ्या मुलीच्या शोधात आहेत त्यांच्या पासून आमच्या जीवितास धोका आहे.प्रशासनास शक्य असेल तर सहकार्य करा असे म्हटले आहे. या निवेदनात संबंधित पीडित महिलेने आपला मोबाईल नंबर सह पत्ता पण नमूद केला आहे.

–//–

आठवडी व्याज म्हणजे..?

“एखद्या व्यक्तीने रु१०,०००/- व्याजाने घेतल्यास आठवड्याला रु१०००/- व्याज द्यावे लागतात, असे एका महिन्यात (४ आठवड्यात ४०००/- व्याज परतावा होतो तर एका वर्षात जवळपास ४८०००/- व्याज द्यावा लागतो तरीही मुद्दल स्वरूपात मूळचे १०,०००/- अखेरपर्यंत तसेच असतात”.—– असिफा मणियार, पीडित महिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *