पालघर : सीमा पोतदार यांची नुकतीच काँग्रेसच्या सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली असून संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या सीमा पोतदार ह्या याअगोदर बोईसर विधानसभा अध्यक्ष , झोनल को ओरडीनेटर विदर्भ रिजन, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया जनरल सेक्रेटरी, आणि आता त्यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

महिला काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुस्मिता देव यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्या ताई सवालाखे यांच्या सहकार्याने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांच्या मार्गदर्शनाने हे पद सीमा पोतदार यांना देण्यात आलं आहे.पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील रहिवासी असलेल्या सीमा पोतदार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सोशल मीडिया प्रदेश अध्यक्ष पदी निवड होणं हे गौरवाच असून पालघर जिल्ह्यासह महराष्ट्रात काँग्रेस नक्कीच उभारी घेईल हे मात्र नक्की.