पालघर : शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या वतीने कोरोनाकाळात सार्वजनिक सेवा देण्याऱ्या व भर पावसात बसून आपलं उदरनिर्वाह करण्याऱ्या मच्छीमार महिलांना छत्र्याचे वाटप करण्यात आले. बोईसर येथील ओव्हरब्रिजलगत बसण्यारया महिलांना शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण व बोईसर विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र ठाकूर यांच्या हस्ते छत्री वितरण करण्यात आले.
पालघर जिह्यात आपली सेवा देण्याऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना व गावपाड्यातील ५००० कुटुंबांना छत्री वाटप करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुंदन संखे यांनी सांगितले .कोरोनाकाळात कुंदन संखे हे विविध स्तरावर सातत्यपूर्ण आपली भूमिका शिवसेनेच्या वतीने निभावत असून सदर प्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख वैभव भोईर,शिवसेनेचे सरावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक साळुंके, कुंभवली ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ संखे, ज्येष्ठ शिवसैनिक मंगेश राऊत, योगेश राऊत तसेच शिवसैनिक उपस्थित होते.