गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव… राजाराम परिसरातील नागरिक हैराण
उन्हाळ्यात ही स्थिती तर पावसाळ्यात कस राहणार….. नागरिकांचा सवाल
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात गेल्या एक दोन महिन्यापासून सतत विजेचा लपंडाव वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे.
मग महिन्याला बिल वसूल करता मग देखभाल कोण करणार अस सवाल राजाराम परिसरातील नागरिकांनी केली आहे.
राजाराम परिसरात जिमलगट्टा वीज उपकेंद्र अंतर्गत वीज पुरवठा केला जातो. परंतु राजाराम ते जिमलगट्टा यामधील अंतर ३० ते ४० की. मी. असल्याने वीज पुरवठा हलका फुलका पाऊस किंवा वारा आला तरी दिवस रात्र खंडित असतो. या बाबत संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांना व कर्मचार्यांना सतत कळवण्यात आले तरी एकच उत्तर देतात की रेपनपली व जिमलगट्टा वाहिन्या एकाच ब्रेकरवर आहे दोन्ही वाहिन्या 40 ते 50 Km आहे व जंगलातून आहेत त्यामुळे हा Problem. आहे करिता कमलापूर व पेरमिली येथे 33/11 केव्हीउपकेंद्र मंजूर असुन ही कामे पाठपुरावाही करण्यात आले नाही मात्र याकडे काना डोळा होत असल्याचे चित्र दिसत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल तर याचा वालि कोण? असा सवाल नागरिकांना केली आहे.
राजाराम.मरनेली पत्तीगाव.चिरेपली. खांदला. गोलाकर्जी.रायगठ्ठा.गुड्डीगुडम.सर्व गावाकरीता एकच लाइनमन च्या भरोशावर कारभार गेल्या अनेक वर्षापासुन सुरू आहे.माञ याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे या परिसरात गेल्या काही वर्षांपासून स्थायी लाइन मन नसल्याने त्याचाही फटका सामान्य नागरिकांना करावी लागत आहे.
मुख्य कारण म्हणजे राजाराम पासून कमलापूर जेवढे गावे आहेत. अंदाजे दहा ते पंधरा गाव
या मध्ये एकूण दोन तीन रोजंदारी किंवा कंत्राटी कामगार काम करत आहेत.
विद्युत लपंडाव बाबत संबंधित कर्मचारी किंवा अधिकार्यांना विचारणा केल्यास ब्रेक डाऊन आहे किंवा झाड पडून तार तुटले असल्याचे नेहमीच सांगत असतात. नेहमी एकच उत्तर मिळत असतो. किरकोळ कारणावरून सुद्धा विद्युत पुरवठा एक ते दोन तास खंडित राहत असतो…..
आत्ता उन्हाळ्यात ही स्थिती होती पण पाऊसाळा जवळ येऊन ठेपली आहे काय स्थिती राहणार असे सवाल राजाराम परिसरातील नागरिकांनी केली आहे…