गडचिरोली: राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष.सौ.शाहीन हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक .25.06.2822 ला राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गडचिरोली तालुक्याची महिला बैठक शासकीय रेस्ट हाऊस येथे पार पडली. गडचिरोली तालुका महिला नीता बोबाटे यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातुन प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगर परिषद व जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीचे ध्येय नजरेसमोर ठेवून स्थानिक पातळीवर महिला संघटना बळकट करण्यासाठी काम करावे, अशा सूचना सौ.शाहीन हकीम यांनी केल्या. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात कशा पद्धतीने काम करावे याचे मार्गदर्शन हकीम यांनी केली या वेळी जिल्हाअध्यक्ष रवी भाऊ वासेकर युवक अध्यक्ष लीलाधर भरडकर शहर अध्यक्ष विजय गोरडवार महिला शहर अध्यक्ष मिलन चिमुरकर जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा रेभनकार महिला जिल्हा सचिव रेखा कोराम जिल्हा सघटन सचिव संध्या उईके महिला निरीक्षक आरती कोल्हे सुवर्णा पवार सुषमा येवले अमोल कुळमेथे युवक कार्यधक्ष प्रसाद पवार चंद्रशेखर गडसुलवार अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *