राजाराम पोलीस स्टेशनमध्ये गावकऱ्यांची तक्रार
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील तिमरम (गुड्डीगुडम) अंतर्गत येणाऱ्या निमलगुडाम, गुड्डीगुडम, तिमरम येथिल तेंदूपत्ता मजुरांना तेंदू पत्ता तोडून एक महिन्याचा कालावधी लोटला असताना अद्यापही कंत्राटदारांकडून पूर्ण मजुरी देण्यात आले नाही. अनेक मजूर तेंदु पत्ता मजुरीवर शेती कामाचे नियोजन व वर्षभराचे नियोजन करतात मात्र तेंदुपत्ता मजुरी पूर्ण न दिल्याने मजुरा मध्ये निराशा पसरली आहे.
ग्राम सभे द्वारे तेंदु हंगाम लिलावा दरम्यान तेलंगणा राज्यातील कंत्राटदाराने कंत्राट घेतले व सात दिवसाच्या आत पूर्ण मजुरी देण्याचे करारपत्र केले परंतु तेंदू हंगाम संपून एक महिना लोटून ही अद्याप पूर्ण मजुरी न दिल्याने शेतकरी व गोर गरीब मजूर हताश झाले आहेत.
निराशजनक नागरिकांनी कंत्राटदारांविरुद्ध राजाराम पोलिस ठाण्यात तक्रार सुद्धा केले असता सदर कंत्राटदार पोलिस ठाणे गाठले परंतू गावात मात्र दिसले ही नाही.तेंदुपत्ता मजुरी अद्याप ही न दिल्याने शेतीचे नियोजन व वर्षभराचे उदरिर्वाहाचे नियोजन कोलमडले असुन गोर गरीब मजूरावर उपासमारीचे वेळ आली आहे. करिता संबधित कंत्राटदारांकडून तेंदुहंगामातील मजुरी लवकरात लवकर मिळवून देण्यास प्रयत्न करावी अशी आशयाचे तोंडी तक्रार उप पोलिस स्टेशन राजाराम खां. येथे करण्यात आले आहे.
या वेळी नागेश शिरलावार, गंगाराम आत्राम, इलियास शेख, चिरंजीव पल्ले आदी मजूर उपस्थित होते.