गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजाराम येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घडू शकतात- ॲड. एच. के आकदर. 27.6.2022 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजाराम येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ॲड. एच. के.आकदर विद्यार्थ्यांना बोलत होते. सध्याच्या काळात आईवडिलांची मानसिकता आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत घालण्यात लागली आहे परंतु हे कुठे तरी थांबायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जर ध्येय निश्चित करून प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द ,चिकाटीने अध्ययन केलास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर पोहोचून ध्येय गाठू शकतात. त्याकरिता आई-वडील देखील विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे अत्यंत गरज आहे, या परिस्थितीत काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब आहेत अशा परिवारातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत घालण्यात शक्य नाही त्याकरिता जिल्हा परिषद शाळेत आपल्याला योग्य शिक्षण मिळू शकतो याचा आपण विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेतले पाहिजे . एवढेच नव्हे तर त्यांनी बोलताना स्वतःचे उदाहरण दिले सातवीपर्यंत शिक्षण याच जिल्हा परिषद शाळेतून झाले घरची परिस्थिती अत्यंत गरीब मार्गदर्शनाचा अभाव अशा वातावरणात देखील पदवीचे शिक्षण विज्ञान शाखेतूनपुणे विद्यापीठातून प्राप्त केले आणि कायद्याचे शिक्षण नागपूर विद्यापीठातून पूर्ण केले.प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याची खूप मोठी संधी होती परंतु त्यांना अधिकारी बनण्यात रुचि नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी देखील केली नाही. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक कार्यात आवड असल्यामुळे त्यांना शहर सोडून गावाकडे यावे लागले, शिक्षणाचा उपयोग गोरगरीब व उपेक्षितांना व्हावा हा त्यांचा शिक्षणाचा मुख्य उद्देश होता.आपण चिमुकल्यांनी आतापासून ध्येय निश्चित करावे व मेहनत घ्यावे. असे मोलाचे मार्गदर्शन ॲड. आकदर यांच्याकडून करण्यात आले व चिमुकल्यांनी शांततेने एकून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पस्पूनपवार सर , प्रमुख अतिथी म्हणून सुरक्षा एच. आकदर उपसरपंचा ग्रा. प.राजाराम, केंद्र प्रमुख आईंचवर सर, जुमनाके सर, मडावी सर, आत्राम सर, पालकवर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *