बारामती, :- बारामती येथील प्रशासकीय भवन परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येकी एक असे वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे, दुय्यम निबंधक अशोक आटोळे, सुरेश जाधव, प्रशासकीय भवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे एकूण ५० वृक्षाचे रोपण केले.
एन टीव्ही न्यूज रिपोर्टर पल्लवी चांदगुडे बारामती पुणे