राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे
प्रतिनिधी (आयुब शेख )
ऐतिहासिक नळदुर्ग शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा पुरविणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना व वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत शहरात सिमेंट रस्ते, गटार बांधकाम, तालिम बांधकाम,संरक्षण भिंत बांधकाम, उद्यान विकसित करणे, व्यायामशाळा, ओपन स्पेस खुली जागा विकसित करणे असे एकुण ३२ कामांकरीता ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला होता. या निधितुन कामे करण्यात येत आहेत. सदरील कामे निकृष्ठ दर्जाची करून ठेकेदारांनी शासनाची व नागरीकांची फसवणुक केली असुन त्यामुळे झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी.
त्याचबरोबर चौकशी पुर्ण होईपर्यंत कामाचे बील अदा करण्यात येऊ नये.शहरात करण्यात आलेल्या विविध कामाचे अंदाजपत्रक हे कामापेक्षा जास्त रकमेचे विशिष्ट लाभ मिळविण्याकरीता ३० ते ४० टक्के रक्कम वाढवुन बनविण्यात आले आहे. यामुळे शासनाच्या निधीचा जास्तीचा वापर होऊन नुकसान झाले आहे. शहरात करण्यात आलेले सिमेंट रस्ते हे निकृष्ट दर्जाचे व अंदाजपत्रकात दर्शविल्याप्रमाणे साहित्य न वापरता हलक्या दर्जाचे वापरण्यात आले आहे. गटार बांधकामात अनेक ठिकाणी स्टीलचा वापर करण्यात आले नाही. त्याचबरोबर रस्त्याची जाडी, लांबी व रुंदी योग्य प्रमाणात ठेवण्यात आली नाही.
सदरील कामे केली जात असताना नगरपालिकेचा अभियंता कांही कामांचा अपवाद वगळता इतर कामांवर जातीने हजर राहिला नाही. शहरातील सर्व ३२ कामे उमरगा येथील पारस कंट्रक्शन या ठेकेदाराने घेतले होते परंतु प्रत्येक्षात काम करणारे ठेकेदार वेगळेच दिसुन येत आहेत. अनेक ठिकाणी कामांची विभागणी करून पोट गुत्तेदारास काम दिले गेले आहे. यामुळे कामाच्या अंदाजपत्रकीय रकमेचा अपवेय झाला आहे. त्यामुळे शहरात करण्यात येत असलेल्या ३२ कामांपैकी ६ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.२६ कामांचे कॉलिटी कंट्रोल प्रमाणपत्रे हे सदरील संस्थेने कामांची पाहणी न करता जागेवर बसुन दिले आहेत. या बोगस प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात यावी. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता तसेच शासनाचे नुकसान टाळण्यासाठी सदरील कामांची त्रयस्तामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. ही चौकशी होईपर्यंत आज तारखेपासुन बिले काढण्यास मनाई करण्याचे आदेश व्हावेत. तसेच जे अधिकारी याकडे डोळे झाक करून बील काढतील ते बील त्यांच्याकडुन वसुल करण्यात यावे अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
ठेकेदाराकडून काम घेऊन निकृष्ट दर्जाचे काम करणारे भाजपचे पोट गुत्तेदार अडचणीत
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे, माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक शरीफ शेख, शब्बीर कुरेशी, महालिंग स्वामी, अमृत पुदाले, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हाईस चेअरमन ताजोद्दीन सावकार, सरदार सिंग ठाकूर, संतोष पुदाले, शिवाजी धुमाळ, राजकुमार खद्दे, अफसर जमादार व संजय दुबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त संभाजीनगर व मुख्याधिकारी न.प.नळदुर्ग यांनाही देण्यात आले आहे. नळदुर्ग शहरातील अनेक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील याप्रकरणी मुख्याधिकारी दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ याची चौकशी करावी ही विनंती शहर विनंती होत आहे