वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील पंचवीस वर्षाची परंपरा तोडरवाल शेतकरी परिवाराकडून परिसरात मिरुग नक्षञ लागताच तसेच दि.6 जून 2024 शेतामध्ये अगोदर सर्वात प्रथम भूमी दैवतची पूजा अर्चना नारळ फोडून संपूर्ण परिवारासह व इतर सहकारी उपस्थित राहून यावर्षी सुख समृद्धी शेती संबंधित चांगले पीक घेऊन दर्जात्मक पीक घेऊन शेतकऱ्यांना उज्वल समृद्ध करून पुण्यात प्रकारची रोगराई रोगराईचा सामना करण्याचे वेळ शेतकऱ्यांवर येऊ नाही अशी विनवणी करून धरती माता यांना नमन करण्यात येतो.पेरणीसाठी सुरुवात होत असते संपूर्ण पहिल्या टप्प्यात 20 एकर व उर्वरित जमीन लगेच पाठोपाठ पेरून हा परंपरेनुसार संकल्प देवीचंंजी तोडरवाल यांच्या मार्गदर्शनात साकार होत असते तसेच शेलु बाजार परिसरात सर्वच शेतकरी बांधव त्यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या निगराणी मध्ये आपली शेती पेरणीच्या संकल्प ठरवतात व तसेच जुन्या पद्धतीनुसार आजही परंपरा शेलुबाजार चे तोडरवाल शेतकरी परिवार यांचा संकल्प सर्व परिसरातील शेतकरी व त्यांचे आदर्श घेऊन अल्पभुधारक शेतकरी व तसेच जास्त शेती असणारे शेतकरी असून त्यांचे मार्गदर्शन सतत असून योग्य मार्गदर्शन करण्याच्या संकल्प या परिवारातून होत असतात.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा ज्या दिवशी पासून मिरूग पेरणीचे संकल्प हाती घेत असतात ही पद्धत 25 वर्षापासून सतत चालू आहे व पेरलेले बीज कोणत्याही नामांकित कंपन्यांचे नसून साध्या पद्धतीचे घरगुती त्याच्यावर प्रक्रिया घरगुती करून संपूर्ण पन्नास एकर जमिनीवर घरगुती बीजवाई उपयोग होतो दरवर्षी पाण्याची भीती असो किंवा कोणत्याही पाण्याची व्यवस्था करत नसून वरून राजांच्या आशीर्वादाने हा तोडरवाल शेतकरी परिवारांचे संकल्प निगडित राहते.
या मशागती करिता मोठ्या प्रमाणात घरगुती ट्रॅक्टर व इतर अवजारे वेळोवेळी सतत शेतीच्या कामाकरिता जे उपयोगात येते त्याची पूर्तता तोडरवाल परिवारातून मुबलक व्यवस्था करण्याचे संकल्प या परिवारातून असून व अनेक कुटुंब अवलंबून असतात. इतरांनाही त्याचे फायदे होत राहते लहान मोठे शेतकरी त्यांचे आदर्श घेऊन शेतकरी संबंधित सामग्री घेणे – देण या रुपी त्यांचे संकल्प नेहमी शेतकरी हिताच्या भावनानुसार त्यांचे प्रयत्न नेहमी तत्पर असतात सहकाऱ्यांची भावना लक्षात घेता संपूर्ण परिसरात नावलौंकिक शेतकरी म्हणून तोडरवाल परिवार घोषित आहे व दरवर्षी सर्वात प्रथम परिसरातून पेरणी करून मोकळे होतात व पुढील शेती संबंधित कार्य वेळोवेळी बदल घडवणे ही एक महत्त्वाची बाब असून सर्वांनी प्रयत्न करणे ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांची जबाबदारी आहे असे शेतकर्यांनी सांगीतले.