राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमित व्हावा, यासाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातर्फे २९ ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. मुंबई येथे रविवारी (ता. ११) झालेल्या राज्याच्या समन्वय समितीच्या बैठकीत जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा एकमताने निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाने राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे.
या संपाबाबत समन्वय समितीचे राज्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी कळविले आहे. या संपात जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.

