मौजे.कराळी ता.उमरगा येथे माजी सैनिक श्री.तानाजी दादाराव वडदरे यांचा सेवापुर्ती सोहळा व त्यांच्या आईचा तुलादान कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात 24 वर्ष भारतीय सैन्य दलात श्री तानाजी यांनी सेवा करून निवृत्त झाल्याबद्दल मा आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी उपसरपंच दादाराव वडदरे तर प्रमुख पाहुणे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, स्वातंत्र्यसैनिक मारुती साळुंखे, उमरगा शिवसेना तालुका प्रमूख बळी मामा सुरवसे,यांच्या सह माजी सैनिक दत्तात्रय वडदरे,कालिदास मंडले, मोहन कर्णे,अशोक कोठावळे, बालाजी काळे,बाळू आष्टे रामकृष्ण मनोरे, विजय चव्हाण,यांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी गावचे सरपंच सुभाष राठोड, पोलीस पाटील सुनील पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ वडदरे,भारत शिक्षण संस्था संचालक दिगंबर बिराजदार मुळज, ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष विजय शेषेराव वडदरे,कोषाध्यक्ष अमर देशटवार ,प्रा युसुफ मुल्ला, अमर परळकर, राजू फुलारी, विजय शिंदे, सतीश कस्तुरे, श्रीकांत वडदरे, परशुराम राठोड, शिवाजी जाधव, रवी मोरे, शिवाजी दादाराव वडदरे , उल्हास वडदरे, सह नातेवाईक , मित्र परिवार , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी श्री तानाजी यांची उघड्या जीपमधून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
