
अहमदनगर : शहरात मनोज जरांगे पाटील यांची काल (सोमवारी) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता रॅली झाली. या रॅलीत घुसलेल्या १४ खिसे कापूंना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. पथकाने आरोपींकडून चोरीस गेलेली रोकड, एक चारचाकी व दोन दुचाकी असा ६ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला.
मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेत घुसून खिसे कापू चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची गोपनिय माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला चोरटे पकडण्याबाबत सूचना केल्या होत्या. खिसे कापू टोळी ही जामखेड व नगर शहरातील असल्याची गोपणीय माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाली. दुपारी ही टोळी नगरमध्ये एक चारचाकी व दोन दुचाकी सह शहरात आली. या रॅलीत सहभागी झाल्यावर ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसून हातसफाई करणाऱ्या चोरट्यांना मोठ्या शिताफीने कोतवाली गुन्हे शोध पथकाने रॅली व सभेतून १४ खिसेकापू चोरट्यांना ताब्यात घेतले.

यात सचिन विष्णु खामकर (वय ३८, रा. प्रेमदान हडको, नगर), अण्णा बाळू पवार (वय ५१, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), श्यामराव रामा गायकवाड (वय २२, रा. मिलिंद नगर, ता जामखेड), अर्जुन तुळशीराम जाधव (वय २०, रा. सुपा हाईडसजवळ, सुपा, ता. पारनेर), मच्छिंद्र दशरथ गायकवाड (वय २६, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), राहुल शरद पवार (वय २०, रा. नान्नज जवळा, ता. जामखेड), बबलू रोहीदास साठे (वय २५, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), शीतल रावसाहेब काळे (वय २४, रा. मिलिंद नगर, ता जामखेड), विकास रमेश गायकवाड (वय २०, रा. मिलिंद नगर, ता. जामखेड), सागर बाळू रिटे (वय २५, रा. कुंभार तळ, ता जामखेड), एक अल्पवयीन मुलगा, विजय अशोक माने (वय २२, रा. मिलिंदनगर, शिक्षक कॉलनी, जामखेड, ता जामखेड), अजिनाथ अण्णा गायकवाड (वय ६०, रा. मिलिंद नगर, जामखेड, ता जामखेड), नागू अण्णा गायकवाड (वय ५४, रा. मिलिंद नगर, जामखेड, ता जामखेड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
