जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून २५ दिव्यांग मतिमंद मुलांचे कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण आणि दिव्यांग-सदृढ विवाह योजनेचे धनादेश लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.
‘एक हात मदतीचा-दिव्यांगांच्या कल्याणाचा’ या अंतर्गत अलका अनिल केदार, सुरेश बळवंत गिते, दीपाली सोमनाथ लोखंडे, संदीप नानासाहेब शिंदे, संगीता सोमनाथ जंगम आदी दिव्यांग व्यक्तींच्या पालकांना दिव्यांग मतिमंद मुलांच्या पाल्यांना पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात तीन जोडप्यांना योजनेचे धनादेश जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी कोकाटे म्हणाले, ”जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात महसूल पंधरवड्यानिमित्त दिव्यांग पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे.”
