कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये एवढे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिले जाईल. म्हणजेच एका पात्र शेतकऱ्याला कमाल दहा हजाराचे अनुदान मिळणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरंतर कापूस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची शेती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात होते.याशिवाय मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात याची लागवड पाहायला मिळते. या दोन्ही पिकांवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

मात्र, गतवर्षी अर्थातच 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली. शिवाय बाजारात अपेक्षित असा दरही मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.