चौकशी करून तात्काळ सुरु करण्याची मागणी

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर शहरामध्ये मागील काही काळापासून चोरी, दरोडे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, अपघात तसेच विविध गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.मात्र, मंगरूळपीर शहरातील अनेक प्रमुख चौक, बाजारपेठ परिसर, शासकीय कार्यालयांच्या परिसरातील तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय मंगरूळपीर पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही यंत्रणाही पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक राहात नाही तसेच एखादी गुन्हेगारी घटना, अपघात किंवा वादविवाद झाल्यास पुरावे उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.सबंधितांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी राष्टवादी काॅग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे इरफान शेख यांनी केली आहे.
शहरातील नागरिकांच्या कररूपाने जमा होणाऱ्या निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडणे ही गंभीर बाब आहे. संबंधित विभागाकडून नियमित देखभाल व निरीक्षण होत नसल्यामुळे शासनाचा निधी वाया जात असून नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी तरी मंगरूळपीर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी,
अशी मागणी राष्टवादी काॅग्रेस पार्टीचे इरफान शेख यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनाच्या प्रति सर्व सबंधित विभागांना पाठवल्या आहेत.

प्रमुख मागण्या

मंगरूळपीर शहरातील सर्व चौक, बाजारपेठ, प्रमुख मार्ग, सार्वजनिक ठिकाणे व शासकीय कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक ऑडिट करण्यात यावे.

बंद असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत.

मंगरूळपीर पोलीस स्टेशनमधील सर्व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करण्यात यावी.

सीसीटीव्ही यंत्रणा दीर्घकाळ बंद राहण्यास जबाबदार अधिकारी व संबंधित यंत्रणेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण व देखरेख नियमितपणे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी नवीन उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *