जनतेने पाटे वरवंटे खरेदी करून समाजाला मदतीचा हात द्यावा

गरजु कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याची गरज

वाशिम : रस्त्याच्या कडेला आवाज करत…. छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या स्वयंपाक घरातील पाटा, वरवंटा, खलबत्ता ई साधने बनवणाऱ्या पाथरवट समाजातील कुटुंबाना नविन वर्ष आणी भिमा कोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधत महावितरणचे संतोष मुंडे आणी सामाजीक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांनी पाथरवट कुटुंबातील महिलांना साडिचोळी,मुलांना कपडे तसेच पुरुषांना शेलाटोपी नारळ आणी मीठाईचे वाटप करुन मदतीचा हाथ दिला.या प्रेरणादायी ऊपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.
आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे, वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा होत आहेत.मंगरुळपीर शहरात पाथरवट समाज पाटा वरवंटा टिकवण्यासाठी फुटपाथवर छिन्नी हातोडीच्या घाव टाकून साधने बनवत आहे, जनतेने स्वयंपाक घरामध्ये एखादा पाटा वरवंटा खरेदी करून या समाजाला जगवावे असेही आवाहन करण्यात आले आहे.या पाथरवट समाजातील कारागीरांची कोरोना महामारीमुळे आर्थिक दुरावस्था झाली आहे.विविध समाजातील गरीब,गरजु कुटुंबियांना आपल्या परीने मदत करुन मदतीचा हाथ द्यावा जेणेकरुन त्यांना जगण्याचे बळ मिळेल.इतर दात्यांनी सूध्दा अशीच मदत करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून ही मदत करत आहोत असे मत यावेळी फुलचंद भगत आणी संतोष मुंडे यांनी व्यक्त केले.

पाटा वरवंटा देतो ग्रामीण जीवनाची आठवण

पाटा- वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची भाजी मिळेल वाचल्यावर अनेकांची पावलं तिकडे वळतात. मोठं अंगण, सारवलेली जमीन, पाट्यावर वाटलेला मसाला, चुलीवरची भाकरी असं वर्णन थेट आपल्याला गावची आठवण करून देत. वाढत्या शहरीकरणात अंगण कमी झाले आणि फ्लॅट आले, चूल गेली, गॅस आला आणि पाटा-वरवंटा गेला, मिक्सर आला. अर्थातच यामागे ज्या समाजांचे त्यावर पोट भरत होते त्यांचे अर्थकारणही बिघडले आहे. त्यापैकीच एक म्हणजे पाथरवट समाज.अशा गरीब कुटुंबियांना मदतीचा हाथ देणे गरजेचे आहे.

छिन्नीने दगड फोडुन वेगवेगळ्या वस्तु बनवण्याची कला होत आहे लुप्त

रस्त्याच्या कडेला आवाज करत छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या मूर्ती आणि स्वयंपाक घरातील साधन बनवण्याची कला हातात असणाऱ्या या समाजातले कलाकार शेवटचे ठरणार आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीने हे काम थांबवून केव्हाच दुसरे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाच्या हव्यासाने अजून एका कलेचा जीव गेल्याचं हे अगदी अलीकडंच उदाहरण आहे. वाशिमच नाही तर संपूर्ण राज्यात ठिकठिकणी दगड फोडून मोठ्या प्रयत्नाने त्यापासून वस्तू घडवणारे कलाकार आहेत. पूर्वी त्यांना या वस्तूंच्या बदल्यात कधी पैसे तर कधी धान्यही मिळायचं. आता मात्र घरात मांडायला किंवा मुलांना दाखवायला म्हणून या वस्तू नेल्या जातात. ग्रामीण बाजाच्या वस्तूंना बाजारपेठेत असणारी प्रचंड मागणी त्यांच्यापर्यंत अजूनही पोचली नसल्याने त्यांच्या वस्तू अनेक जण बाहेर जाऊन विकतात आणि हे मात्र दिवस साजरा झाल्याचे समाधान मानतात.अशा कलाकारांना मदत करुन जगवणे खुप आवश्यक आहे जेणेकरुन आपली संस्कृती टिकुन राहिल असेही सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी सांगीतले.इतरांनीही या ऊपक्रमाची प्रेरणा घेणे गरजेचे आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *