भर जहागिर जिल्हा परिषद सर्कल मध्ये अनिलभाऊ गरकळ यांना वाढता प्रतिसाद
( प्रतींनिधी राहुल जुमडे )
वाशिम : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भर जहागिर जिल्हा परिषद सर्कलच्या पोट निवडणूकीतील प्रचाराला दिवसागणित रंगत वाढत आहे.अनेक दिग्गज उमेदवारांनी या सर्कलमधील प्रतिनिधित्व करण्यासाठी कंबर कसलेली दिसते.परंतु सरकारी नोकरीचा त्याग करून समाजसेवेचा वसा घेत अनिलभाऊ गरकळ यांनी प्रथमच या जिल्हा परिषद सर्कल मधील निवडणूकीला समोरे जात आसतांनी जणमानसातुन उदंड प्रतिसाद मिळत आसल्याचे दिसुन येत आहे.

भर जहागिर सर्कल चे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी च्या सौ.उषाबाई माणिकराव गरकळ यांनी केलेले आहे.कोरोणा महामारीच्या काळातही विकास कामांचा आलेख वाढता ठेवल्याने या सर्कल मध्ये निश्चितच विकास कामे करना-या उमेदवारांना मतदारराजा कौल देईल.हल्ली या सर्कल मध्ये सौ.उषाबाई गरकळ यांचे पुत्र अनिलभाऊ गरकळ यांना वंचित बहुजन आघाडी व वाशीम जिल्हा जनविकास आघाडीच्या युतीने उमेदवारी बहाल केली आहे विशेष म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर,आदरणीय आनंतरावजी देशमुख यांचे आशिर्वाद सतत सोबत घेऊन जनमाणसांच्या सर्वांगीण विकासा करीता सरकारी नोकरीचा त्याग करून निवडणूक लढवित आहेत.या सर्कलमध्ये मा.खा.आनंतरावजी देशमुख यांचा मोठा चाहता वर्ग आसुन आदरणीय आंबेडकर साहेबांचे शब्दच प्रमाण समजुन आदेशाचे पालन करणारा मतदार राजा आसल्याने काही सर्वेक्षणा अंती जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी चे पारडे जड आहे.अनिलभाऊ गरकळ यांनी प्रारंभी पासूनच समाजसेवेचा वसा घेतलेला दिसतो.सर्कल मधील पारधी पाड्यावर पारधी बांधवा सोबत दिवाळी,भाऊबिज साजरी करीत आशा हलाखिच्या परीसरातील वंचितांना सुध्दा मुबलक सुखसुविधा मिळविण्यासाठी सतत धडपडनारे व्यक्तीमत्व म्हणून अनिलभाऊ गरकळ यांची सर्वदुर ओळख आहे.परिसरातील आसरा माता यात्रा असो कि लोढाईमाता यात्रा असो किंवा विविध गावातील धार्मिक उत्सव असो अशा विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपला खारी वाटा उचलन्याचे भाग्य अनिलभाऊ गरकळ यांच्या नशिबी आलेले आहे.त्यामुळे येथिल सर्कल चा सर्वांगीण विकास करण्याच्या उदात्त हेतुने अनिलभाऊ गरकळ यांना मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद मिळत आसल्याचे व अनिलभाऊ गरकळ यांच्या प्रति मतदारराजाची सकारात्मक चर्चा मधुन दिसुन येत आह