मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण द्यावं. आपल्याला राजकारणात उतरण्यात रस नाही. आरक्षण मिळालं नाही, तर आपण राजकारणात उतरणार. तसेच आपण राजकारणात उतरलो तर तुमचा सुफडा साफ होईल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

जरांगे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण द्यावे. त्यांना हे मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. आम्हाला राजकारण काय करायचे आहे? तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्ही उभे राहणारच. तुमचे राजकीय गणित आम्ही बिघडवणार. मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका. नाहीतर तुमचा सुपडा साफ होईल”,असा इशाराच मनोज जरांगेनी दिला आहे.
