मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची महाविकास आघाडीत भीती बसली आहे. कारण, लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करुन बसली आहे. या योजनेवरुन कोणी कितीही टीका केली तरी, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमचे सरकार बांधील आहे, असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. तर सुप्रिया सुळे यांनी योजनेचा पहिला हफ्ता बँकेत जमा झाला आहे, तो सर्व बहिणींनी लवकर काढून घ्यावा, नाहीतर भाजपचा एक नेता म्हणाला आहे की, पैसे परत घेतले जातील. असं म्हणत या योजेवरून सरकारवर टीका केली होती. याबाबत पालकमंत्री विखेंना विचारले असता त्यांनी मविआ नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
